
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.23 भेसळ युक्त बायो-डीझेल विक्री करणारे पंप बंद करून तात्काळ कारवाई साठी मायनाॅरीटीज डेमोक्रेटीक पार्टीचे तालुका अध्यक्ष शेख रफिक शेख रहिम यांनी तहसिल कार्यालयासमोर दि.२१ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.तसेच ज्या विविध मागण्यांकरीता हे आमरण उपोषण असुन त्यात तालुक्यातील अवैध बायो-डीझेल पंप बंद करण्यात यावे,तज्ञ व वरीष्ठ अधिकाऱ्यामार्फत बायोडीझेल विक्री करणाऱ्या पंपाची तपासणी करण्यात यावी,अवैध बायोडीझेल पंपावरील डीझेल विक्री बंद करण्यात यावी, अवैध बायो-डीझेल पंपावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
ह्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी बुलडाणा,जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा, आयुक्त पुरवठा विभाग अमरावती, आयकर विभाग खामगांव इत्यादींना देण्यात आल्या आहेत.तहसिलदार नांदुरा यांच्या आदेशानुसार एका बायो-डीझेल पंपावर कारवाई. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर खामगांव रोड वरील एका बायो-डीझेल पंपावर दि.२२ फेब्रुवारीला कारवाई करून सील केल्याची माहिती पुरवठा निरिक्षक सुनिल पेठकर यांनी भ्रमणध्वनी द्वारे दिली. ह्यावेळी मंडल अधिकारी रमेश उगले व तलाठी सोनोने हे उपस्थितीत होते.