
दैनिक चालु वार्ता
अतनूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. आजच्या सर्व जाती धर्माच्या मावळ्यांनी मिळून शिवरायांची जयंती साजरी करायला हवी असे प्रतिपादन प्रा.विशाल गरड यांनी केले ते अतनूर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्याना प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक संजय ऊर्फ बालासाहेब शिंदे अतनूरकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.डॉ.सुधाकर भालेराव, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मारोती पांडे, माजी संचालक धर्मपाल देवशेटे, युवक काँग्रेसचे दळवे पाटील, भाजपाचे माजी जळकोट तालुका तालुकाध्यक्ष बालाजी केंद्रे, उद्योजक दत्तात्रय सावरे-पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे जळकोट तालुकाउपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गंगाधर वाघमारे, उपाध्यक्ष राहुल गायकवाड, सचिव एकनाथ गायकवाड, शिवजन्मोत्सव समितीचे मुख्य संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मुक्तेश्वर येवरे-पाटील, रिपाईचे जळकोट तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, विजय पाटील, साहेबराव पाटील, गोविंद कोकणे, फय्याज मुंजेवार, ज्ञानेश्वर जाधव, माधव बोंडगे, नितीन सोमुसे, बालाजी येवरे, गोविंद बारसुळे, रवी पांचाळ, गौतम गायकवाड, संग्राम घुमाडे, सौरभ शिकारे, अविनाश शिंदे, विशाल कांबळे, व्यंकटेश शिंदे, विनोद सोमुसे, मयुर हिंगणे, श्रीकांत बोडेवार, सुदाम बाबर, गजानन सोमुसे, योगेश चव्हाण, रवी कापडे, सचिन बोडेवार, शिल्पकार गायकवाड, मैफुज मनियार, ईश्वर कुलकर्णी, संजय चव्हाण तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह अतनूर ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. या व्याख्यानास अतनूर व परिसरातील शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.