
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- देगलूर तालुक्याचे भूमिपुत्र गंगाप्रसाद मुदीराज सरचे पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली देगलूर शहरात आले असता त्यांचा सत्कार वर्ग मित्र प्रेरणा कम्प्युटर अकॅडमीचे संचालक श्री झरे सर व त्यांचे सहकारी श्री गोवर्धन पाटील बामणे दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे सर यांच्यातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुदीराज सरांचे संपूर्ण देगलूर तालुक्यात त्यांचा चांगलाच चाहतावर्ग आहे. सविस्तर 2008 या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उप अधीक्षक पदी त्यांची निवड झाली.
नाशिक अकॅडमी प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी पहिली पोस्टिंग विलेपार्ले मुंबई येथे जॉईन केले तसेच 2013ला मुंबई लीडर क्राईम ब्रँच सहाय्यक पद दिले गेले त्यानंतर त्याने अनेक गुन्ह्यांचा निर्भीडपणे पडदा उठवत कामगिरी बजावल्यामुळे फेब्रुवारी 2022 रोजी पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देऊन त्यांना तेथील इनचार्ज करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत 73 पारितोषिक मिळवलेले आहेत विशेष म्हणजे माननीय पोलीस आयुक्त यांच्या तर्फे दोन वेळेस सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपला कामाचा कायमचा दबदबा गंगाप्रसाद मुदीराज सर ठेवून आहेत मूळगावी देगलूर शहरात आले असता 21 फेब्रुवारी 2022 रोजी भव्य नागरीक सत्कार त्यांचा करण्यात आला . त्यांनी आपल्या सेवेमार्फत सामाजिक शैक्षणिक या कार्यामध्ये खूप मोलाचे योगदान दिले.वेळोवेळी नव तरुण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून सामाजिक जीवनामध्ये चांगला माणूस कसा बनवता येईल याबद्दल नेहमी तरुणांना ते मार्गदर्शन करत असत. अशीच पुढील काळामध्ये त्यांनी कार्य करत राहो आणि यशाच्या शिखरे प्राप्त करत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना देगलूर नागरिकांतर्फे करण्यात आली.