
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
चाकूर :- भाटसांगवी येथे शिवजयंती निमित्त व्याख्यान आयोजित केले होते तव्याख्यात्या सौ अर्चनाताई भोर-करंडे (पुणेकर) यांचे विचार महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुण वर्गाला आज २१ व्या शतकात आत्महत्येची कीड लागली आहे ,शिव काळातील शेतकरी सुखी होता,त्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघायचा कारण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसुत्रा नुसार “शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये” अशी सक्त शिकवण महाराजांची मावळ्यांना होती.
महाराजांनी साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्याला मंत्र दिला ” पाणी अडवा ,पाणी जिरवा” परंतु आम्ही हा मंत्र याची आडवा ,त्याची जिरवा ” हा असा घेतला.तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ एकच होता.तुकाराम महाराजांनी त्या वेळी सांगितले “वृक्ष वल्ली ,आम्हा सोयरे वनचरे…” मात्र आम्ही खड्डा एकच झाडाचे रोपटे दर वर्षी बदलून त्याच खड्ड्यात लावत गेलो.पण आमच्यात बदल झाला नाही.
पुष्पा पिक्चर येऊन महिनाच झाला मात्र श्रिवल्ली घराघरात पोहोचली पण वृक्षवल्ली येवून ४०० वर्ष लोटली तरी अजून त्याचे अनुकरण घरा घरात नाही ही शोकांतिका आहे! कार्यक्रमाचे नियोजन समस्त गावकरी व शिवशंभू सार्वजनिकनंन शिवजन्मोत्सव भाटसांगवी यांचे नियोजन होते पुढाकार श्रीराम टमके अभिषेक शिंदे वैभव करडीले दत्ता हवलदार शंकर टमके विवेक कवटे