
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.22 भारतभर पत्रकारांच्या तसेच जनसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी पत्रकारांची संघटना म्हणून प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.संतोषजी निकम यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा येथे पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.हे वृक्षारोपण नांदुरा तहसीलच्या आवारात करण्यात आले असून या वृक्षारोपणाला मा. नायाब तहसीलार श्री शैलेंद्र चव्हाण साहेब,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे, तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडेराव,तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल बिचारे,शहाराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,दिलीप इंगळे, संतोष तायडे,अरुण सुरवाडे,पुरुषोत्तम भातुरकर व इतर पत्रकार उपस्थित होते