
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- विवाहित प्रेमीयुगुलाने धारदार चायना चाकूने गळा चिरत,पोटात वार करून आत्महत्या केली.माहिती सूत्रानुसार ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास परतवाडा-अंजनगाव सुर्जी मार्गावरील येणी पांढरी येथील एका शेतशिवारात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठताच फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
मयत सुधीर रामदास बोबडे (वय ५२)रा.वनश्री कॉलनी कांडली व मयत अलका मनोज दोडके (वय ४८) रा.रामनगर कांडली अशी मृत संबंधित माहिती असून चाकूने वार करून आत्महत्या करणाऱ्या विवाहित प्रेमी युगुलांची नावे आहेत. दोघेही मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होते.बुधवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतातील खोलीत दोघांचे मृतदेह एकमेकाला आलिंगन घातलेल्या अवस्थेत दिसून आले.
मृतदेहाजवळ चायना चाकू आढळल्याने चाकूने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.माहितीसुत्रानुसार सुधीर बोबडे याचा कांडली कविठा मार्गावर पान टपरीचा व्यवसाय आहे तर अलका दोडके या गृहिणी होत्या.दोघांचे वेग-वेगळे संसार असून मुलं-बाळं आहेत.
घटनास्थळी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी गोवर हसन परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले व टीमने पंचनामा केला व पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.