
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- ग्रामविकास विभाग आणि सामाजिक न्याय विषेश सहाय्य विभागासह ईतर विविध विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दरवर्षी विविध कल्याणकारी योजना व वैयक्तिक लाभाच्या योजणा राबविण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. तसेच या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणीसह हि माहिती तळागाळातील गोरगरीब बेरोजगार दिव्यांग लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित करून प्रसार माध्यमाद्वारे योजनांची जनजागृती करणे गरजेचे असताना आपल्या विभागाकडून देण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमच्या सारख्या संघटणाकडुनच जर दिव्यांगांची लूट केली जात असेल आणि या लुटित आपला विभाग सुद्धा सहभागी असल्याचा संशय येत असेल तर ही फार खेदाची आणि निंदनीय बाब आहे.
आपल्याकडुन जर योग्य प्रकारे सर्व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असती तर आम्हा दिव्यांग संघटणांना कधीच आंदोलने उपोषणे करण्याची वेळ आली नसती आणि सदरील विषयांकित गंभीर बाब घडली नसती त्यामुळे आपणास कळकळीची विनंती करण्यात येते की ज्याप्रमाणे ५ टक्के राखीव निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी झाली आहे त्यानुसार आम्हाला दाट शंका आहे कि बीज भांडवल योजना आणि अपंग अव्यंग विवाह प्रोत्साहनपर योजना यात सुद्धा पैशाची मागणी झाली असेल त्यामुळे लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित कर्मचा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.अशी मागणी अपंग सेवक राहुल साळवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना केली आहे.