
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील पाताळगंगा-उम्रज दगडसांगवी हा दिड किलो मिटरच्या रस्त्याचे काम झाले आहे.सदरील गुत्तेदार हा लोकप्रतिनीधीचा पुतन्या असल्याने रस्त्याचे काम अत्येत निकृष्ट दर्जाचे केले आहे.त्यामुळे या कामाची गुणनियंत्रक विभागाकडुन करण्यात यावी अन्यथा 23फेब्रुवारी रोजी उपोषणला बसण्याचा ईशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिली होती .अधिकारी हे कामावर जाऊन फक्त पाहणी करुन गुत्तेदाराला पाठिशी घालत असल्याने उप अभियंता बांधकाम जिल्हा परिषद उपविभाग कार्यालय समोर बालाजी चुक्कलवाड हे उपोषणला बसले आहेत.
गुत्तेदार हे बोगस कामे करत असल्याने अनेक गावातील तिनते चार महिन्यातच रस्ते खराब झाल्याचे प्रकार अनेक गावात घडले आहेत. कंधार तालुक्यातील राजकीय नेतेच गुत्तेदार बनले असल्याने रस्त्याची कामे बोगस होत आहेत.ग्रामीण भागात जिल्हा परिषद अंतर्गत झालेले रस्ते तर सर्रास बोगस झाले आसुन काही महिन्यातच या रस्त्याचा धुरुळा झाला आहे.कंधार तालुक्यातील काही जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य हे स्वता गुत्तेदारी करत आहेत तर काही त्याचे नातेवाईक गुत्तेदारी करीत असल्याने तालुक्यातील झालेले सर्वच रस्ते बोगस झाले आहेत.उमरज येथे संत नामदेव महाराज यांचे प्रसिद्ध देवस्थान आहे.
असे असताना ही पाताळगंगा -उमरज-दगडसांगवी हा दिड किलो मिटरचा रस्त्या गेल्या अनेक वर्षापासुन खराब झाला होता.या रस्त्या आता कुठे तरी योग आला असुन या रस्त्याचे काम झाले आहे.सदरील रस्त्याचे काम करणारे गुत्तेदार हे लोकप्रतिनीधीचे पुतने असल्याने रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या बोगस कामामुळे काही महिन्यातच हा रस्ता उखळुन जाणार आहे.त्यामुळे सःबधीत गुतेदार हा कोणाचा ही नातेवाईक असला तरी त्या कामाची चौकशी गुणनियंत्रन विभागाकडुन करण्यात यावी यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेऊन संबधित अधिकारी कामावर जाऊन फक्त पाहणी करुन गुत्तेदारास पाठिशी घालत आहेत. गुत्तेदार हा आमदार मोहदयाच्या बळावर बघुन घेण्याच्या धमक्यादेत असल्याने माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड हे 23 फेब्रुवारी 2022 रोजी उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालया समोर उपोषणला बसले आहेत.
माजी सैनिक धमक्याना भिक घालत नाहीत-बालाजी चुक्कलवाड
उमरज येथिल संत नामदेव महाराज यांच्या देवस्थानाला जाणारा रस्ता आमदार पुतन्याने अंदाज पत्रकानुसार केला नसुन संपुर्ण कामच बोगस झाले आहे.या कामाची चौकशी करण्याची मागणी केली तर बघुन घेण्याच्या धमक्या दिल्या जात आहे.आशा धमक्याना माजी सैनिक भिक घालत नसुन .हा रस्ता अंदाज पत्रका प्रमाणे होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत.