
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मुखेड तालुक्यातील खैरकावाडी (गोकुळवाडी) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विठूमाऊली प्रतिष्ठानचे सहसचिव श्री ज्ञानेश्वर शिरबरतळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले, व उपाध्यक्ष श्री मोगलाजी गणपतराव बरसमवाड यांनी प्रतिमेला वंदन केले.
यावेळी विठूमाऊली प्रतिष्ठानचे सदस्य श्री महेश गंगाराम पाटील व गावातील ज्येष्ठ नागरिक श्री राजाराम पाटील ,श्री रघुनाथ पाटील ,तसेच श्री मधुकर पाटील ,श्री दत्तात्रय नाईकवाड आणि गोल्ला गोलेवार समाज गोकुळवाडी शाखेचे युवा अध्यक्ष श्री पवन कुमार शिरबरतळ व उपाध्यक्ष श्री गोविंद शिरबरतळ तसेच श्री प्रल्हाद बरसमवाड, श्री प्रल्हाद शिरबरतळ, श्री विठ्ठल शिरबरतळ आदि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते,