
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री रमेश राठोड
आर्णी :- आर्णी येथे श्री.सचिन भोयर हे आपल्या घराचे छतावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अतुलनिय योगदान आहे .त्यामुळेच रयतेच्या या राजाबद्दल आज ही खूप मोठी श्रद्धा आहे. त्यातुनच आर्णीतील एका शिवप्रेमीने आपल्या घराच्या छतावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारुन आपले शिवप्रेम प्रगट केले. आर्णी येथिल बालाजी पार्क मधिल रहीवासी सचिन भोयर असे या शिवभक्ताचे नाव आहे.
सचिन भोयर हे शेतकरी आहे,सचिन भोयर यांचे कौतुक म्हणुन आर्णी येथिल फयाज सय्यद, युनुस बाबा, राजिक कुरेशी, मोहमिद सय्यद, ईरफान शेख,मासुम रजा, परवेज बेग, समद सय्यद, या मुस्लिम तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती चे औचित्य साधुन सचिन भोयर हयांच्या घरी जावुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला दुग्धअभिषेक करुन व हार अर्पण करुन अभिवादन केले.सचिन भोयर या शिव भक्तांचे फयाज सय्यद यांनी
शाल श्रीफळ देवुन सत्कार केला.
मुस्लिम समाजाच्या तरुण युवकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यांमध्ये कुणावरही अन्याय अत्याचार खपवून घेतले जात नव्हते पीडितांना न्याय देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.
शिवाजी महाराज हे बहुजनांचे कैवारी होते त्यांच्या राजवटीमध्ये सुख समृद्धी आणि शांती होती त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सैनिक प्रमुख जबाबदार पदावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी
रयतेच्या रक्षणासाठी अनेक किल्ले बांधले आरमार दल उभे केले
या अभिवादन प्रसंगी फयाज सय्यद युनुस बाबा राजिक कुरेशी मोहमीद सय्यद परवेज बेग ईरफान शेख समद सय्यद मासुम रजा व ईतर मुस्लिम तरुण उपस्थित होते.