
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनानंतर टॉलीवूड सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन् यांनी ललिथा यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. तीन दिवसांनी ललिथा या त्यांचा जन्मदिन साजरा करणार होत्या. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. जेव्हा 2016 मध्ये विजयन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा ललिथा यांनी संगीत नाटक अकादमीचे अध्यक्षस्थान भुषवले होते. मध्ये काम करत असल्यानं त्यांना केपीएसी नाव मिळाले. त्याच नावानं त्यांना ओळखले जाऊ लागले.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ केपीएसी ललिथा यांनी टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं. त्यांच्या नावावर 550 हून अधिक चित्रपटांची नोंदही आहे. 1969 मध्ये त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या हटक्या अभिनय शैलीचे लाखो चाहते होते. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. 1969 मध्ये Kootukudumbham चित्रपटातून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र दिग्दर्शक के एस सेथुमाधवन यांच्या चित्रपटांनी ललिथा यांना मोठी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांच्या वाट्याला अमाप लोकप्रियता आली. ललिथा यांना दोन राष्ट्रीय पुरस्कांरांनी गौरविण्यात आले होते.