
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला बहुप्रतिक्षित झुंड हा चित्रपट पुढील महिन्यात 4 तारखेला प्रदर्शित होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता त्याचा ट्रेलर प्रसिद्ध झाला असून तो (trailer) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत असून अवघ्या अर्ध्या तासात एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मराठी अभिनेता, पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये लीलय़ा वावरणाऱ्या नागराजच्या झुंडच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहत होते. यापूर्वी त्याच्या टीझरनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. अजय अतुलचं संगीत असणाऱ्या झुंडमध्ये एका फुटबॉल कोचची कथा सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये सैराट चित्रपटातील आर्ची-परशा म्हणजे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर सुद्धा दिसून येत आहे.
फँड्री चित्रपटातील जब्या आणि त्याचा बाबा म्हणजेच सोमनाथ अवघडे आणि किशोर कदम देखील दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये सैराट चित्रपटातील आर्ची-परशा म्हणजे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर सुद्धा दिसून येत आहे. फँड्री चित्रपटातील जब्या आणि त्याचा बाबा म्हणजेच सोमनाथ अवघडे आणि किशोर कदम देखील दिसून येत आहेत.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटनं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटांनं 110 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता त्याच्या या चित्रपटाकडून देखील मोठी अपेक्षा आहे. नागराज झुंडमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटामध्ये बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे.