
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भारतामध्ये क्रीकेट हा एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे. भारतातील क्रीकेट प्रेमींसाठी IPL चा प्रत्येक हंगाम ही जणू एक पर्वणीच असते. आणि यंदाचा IPL चा हंगाम तब्बल 2 वर्षांनंतर भारतात खेळवला जाण्याची चिन्ह दिसत आहेत ह्याशिवाय यंदा IPL चं मेगा Auction आहे.त्यामूळे क्रीकेट प्रेमींसाठी यंदाचा हंगाम म्हणजे दुग्ध-शर्करा योगच म्हणावा लागेल.
इंडियन प्रीमिअर लीगच्या अर्थात IPL च्या१५ व्या पर्वासाठी होणाऱ्या ‘मेगा लिलावा’ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ६०० खेळाडूंची आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. हा लिलाव आज सुरू झाला आणि १३ फेब्रुवारी म्हणजेच उद्या देखील लिलाव होणार आहे.