
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पुणे :- मिळालेली अधिक माहिती अशी की रिपब्लिकन सेनेचा नामफलक काही अज्ञातांनी दि,२१ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ११:वा. फाडून त्यावरती नावे फाडून विटंबना केल्याची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर न.२२ स्मशानभूमी रोड निगडी येथे घडली. दरम्यान नामफलकावरती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर राज्याध्यक्ष सागर डबरासे व महिला आघाडीच्या समितीचे नावे व रिपब्लिकन सेनेचे नाव फाडून विटंबना केली आहे.
तरी रिपब्लिकन सेनेच्या नाम फलकाची विटंबना करणाऱ्यां व्यक्तीचा शोध काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. दरम्यान त्याठिकाणी सी.सी.टिव्ही कॅमेरे आहेत याची माहिती प्रशासनास असावी.जर येत्या काही दिवसात कारवाई झाली नाही. तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल. असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.
दरम्यान या पत्रकावरती शहराध्यक्ष धुराजी शिंदे कार्याध्यक्ष मुकुंद रणदिवे, झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष राजू गायकवाड, ज्येष्ठ नेते भीमराव सुरवसे, महिला आघाडीच्या शाखाध्यक्षा छाया क्षिरसागर, दत्ताभाऊ गायकवाड, संघटक रमेश कांबळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.दरम्यान येत्या काही दिवसात कारवाई झाली नाही, तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.