
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पुणे : राज्यभरातील सुरक्षारक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी क्रांतिकारी सुरक्षारक्षक संघर्ष समितीचे समन्वयक सतीष एस. राठोड हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह दि,१९ फेब्रुवारी २०२२ पासुन मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. तरी भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हा सचिन राऊत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय प्रदेश पदाधिकाऱ्यांसह आझाद मैदानावरील सुरक्षारक्षकांच्या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला आहे.असे एका प्रसिद्ध केलेल्या पत्रकात महासंघाने म्हटले आहे.
दरम्यान या पत्रकात असे नमूद केले आहे की, सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्या शासनाकडून पुर्ण व्हाव्यात, यासाठी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ आप्पासाहेब आहेर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बन्सीदादा डोके, राष्ट्रीय सरचिटणीस राम शिंदे, राष्ट्रीय सचिव राजेंद्र जगदाळे, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता राजन भावंड, प्रदेश उपाध्यक्ष संजय मिरगुडे, प्रदेश सचिव मनोहर सुगदरे, उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष अनिल फोंडेकर, प्रदेशाध्यक्षा उद्योग आघाडी श्रेया तटकरे, प्रदेश कार्याध्यक्षा उद्योग आघाडी प्रवीणा सावंत यांनी दिली आहे.