
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- येत्या ६ मार्च रोजी होणाऱ्या या दौऱ्यात पुणे महापालिका, गरवारे मेट्रो स्टेशन येथे पंतप्रधान मोदी भेट देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी सुरु असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी केली.
सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘भूमिपूजन केलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पणसाठीही पंतप्रधान मोदी शहरात येताहेत ही समस्त पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे.
पुणे महापालिका आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा स्मारकाचे आणि पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शिवाय पंतप्रधान मोदी मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास करणार असून जवळ असणाऱ्या मैदानावर पुणेकरांना जाहीर कार्यक्रमाद्वारे संबोधित करण्याचेही प्रस्तावित आहे. या दृष्टीने आढावा घेतला’.