
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- भाजपशासित राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया का होत नाहीत? असा सवाल अस्लम शेख यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशा प्रकारच्या द्वेषाच्या कारवाईचं कुठलंही समर्थन होऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शेख म्हणाले, अशा प्रकारची द्वेषाच्या कारवाईचं कुठलंही समर्थन होऊ शकत नाही. एखाद्यानं चूक केली असेल तर अशी कारवाई होण ठीक आहे. पण संपूर्ण महाविकास आघाडी नवाब मलिकांच्यासोबत आहे. पहाटे पाच वाजता ईडीकडून अशा प्रकारची कारवाई करणं हे खूपच चुकीचं आहे.
महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांची नावं अशा कारवाईबाबत पुढे येत आहेत. इतरही राज्यात आपण पाहाल तर जिथं भाजपची राज्ये आहेत तिथ एकाही मंत्र्यावर अशा प्रकारची कारवाई झालेली नाही, असंही यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.