
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- तालुक्यातील प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना अंतर्गत अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी अनिल सोळंके प्रकल्प उपसंचालक आत्मा, ज्ञानेश्वर बरदे तालुका कृषि अधिकारी, सिल्लोड, पवन कुमार काबरा जिल्हा संसाधनव्यक्ती, औरंगाबाद यांनी तालुक्यातील विविध गावातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या कार्यशालेचे आयोजन मंगरूळ फाटा येथील आकाश प्रशिक्षण केंद्र याठिकाणी करण्यात आले होते.
यामध्ये १०० च्या आसपास शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री योजना असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयान योजना सन २०२०-२१ ते २०२४ २५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन ” या धर्तीवर राबविली जाणार आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांनी केले आहे.
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भोरत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सन २०२०-२१ ही केंद्र पुरस्कृत योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केले आहे. ही योजना असंघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता आहे. याचा कालावधी सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांचा असून एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. जिल्ह्यासाठी मका पिकासाठी मूल्य साखळी व सामूहिक सुविधा निर्मितीकरिता अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.