
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
लोहा :- लोहा तालुक्यातील बोरगाव (आ)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमासाठी प्रसिद्ध असून समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा आपल्या कीर्तनातून दुर करून या देशाला स्वच्छतेचा संदेश देणारे महान राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची…जयंती शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी झाडू, खराटा घेऊन शाळा व आजूबाजूचा परिसरासह रस्ते स्वच्छ करून साजरी करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पदोन्नत मुख्याध्यापक श्री.बळी शेलगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, उपाध्यक्ष रंगनाथ पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मार्गदर्शन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बहीशाल शिक्षण केंद्राचे वक्ते तथा उपक्रमशिल प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.रमेश पवार यांनी गाडगे बाबा यांच्या चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या चरित्राचे अनेक पैलू स्पष्ट करून गाडगे बाबे हे अज्ञान,अंधश्रद्धा, कर्मकांड,समाजातून दुर करणारे चालते बोलते लोक विद्यापीठ होते.असे सांगितले.
या कार्यक्रमात अनेक विद्यार्थांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले तर आभार सौ. सुचिता गोधणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे जेष्ठ शिक्षक बालकिशन देशमुख,अंबर फुलसे,सौ ज्योती फुके, राहुल हारडे यांनी परिश्रम घेतले.