
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- येथील भूमिपुत्र डॉ. दत्तात्रय मठपती यांची सहाय्यक शिक्षण उपसंचालक पदी पद्दोन्नत्तीने विभागीय उपसंचालक कार्यालय लातूर येथे निवड करण्यात आली आहे. डॉ. मठपती साहेब यापूर्वी गटशिक्षणाधिकारी भोकर येथे कार्यरत होते. त्यांचे पेठवडज सर्कल मधील जनतेनी त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच पुढील मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
कंधार तालुक्यातील गऊळ येथील श्री. तेलंग साहेब शिक्षण संचालक विभागीय कार्यालय लातूर येथे यापूर्वीच कार्यरत आहेत आणि डॉ. मठपती साहेब यांच्या निवडीमुळे कंधार तालुक्यातील दोन उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा पेठवडज सर्कल व कंधार तालुक्याला मान मिळाला आहे. दोन्ही अधिकारी साहेबांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.