
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
शिरपूर :- विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण व संत गाडगे महाराज जयंती निमित्ताने माजी विद्यार्थी श्री निलेश आधारसिंग राजपूत व सौ मोनिया निलेश राजपूत हे पी.एस.आय दाम्पत्य प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राचार्य श्री आर एफ शिरसाठ हे अध्यक्ष स्थानी होते या मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली पी एस आय श्री निलेश राजपूत व सौ मोनिया राजपूत यांचा सत्कार प्राचार्य श्री आर एफ शिरसाठ सर व सौ मीना पटेल मॅडम यांनी केला.
सत्काराला उत्तर देताना पी एस आय सौ मोनिया राजपूत यांनी विद्यार्थिनींनी आपले ध्येय निश्चय करून आईवडिलांचा विश्वास कायम ठेवून मेहनतीने आपले यश प्राप्त करू शकतो तसेच संत गाडगे महाराज यांची स्वच्छता विषयीची शिकवण आज ही महत्त्वाची आहे स्वच्छ वातावरण आपले मानसिक व शारीरिक क्षमता विकसित करते असे विचार व्यक्त केले, पी एस आय श्री निलेश राजपूत यांनी ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सर्व प्रकारची मदत व 12 वित प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके मोफत देण्याचे जाहीर केले विद्यार्थ्यांनी शिस्त व नियमित व्यायाम ,आणि अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येक विषयातील संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे असे विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने दिलेल्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराज यांचे गुण आत्मसात करावे व विद्यालयाचा आदर्श विद्यार्थी व्हावे असे आव्हान केले प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील ,सूत्रसंचालन श्री एन वाय बोरसे व आभार श्री एस आर देसले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ दिपाली निकम,श्री एन डी चव्हाण श्री एस एम पाटील श्री पी टी चौधरी श्री व्ही एस ईशी,श्री डी आर राजपूत श्री व्ही डी पाटील श्री एस जे पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.