दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुका काठी येथे 6 मार्च रोजी बैठक आदिवासी समाज पूर्वीच्या काळापासून चालत आलेली संस्कृति,रूढी, परंपरा, चालीरीती आजही अबाधित ठेवून आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.प्रकृतिपुजक असलेला आदिवासी समाज आजही निसर्गाला देव मानतो. परंतु आज आदिवासी जमातीची अस्मिता, संस्कृति,आत्मसम्मान आणि आदिवासी देवीदेवतांची पुजाविधी, जन्ममृत्यूविधी,सण -उत्सव,लग्नविधी, कणी(खोलो), गवाण(ओखडो), निलीचारी, वागदेव,गांवदिवाळी,आथुटी, इंदोल,ओलीजोगण व इतिहास धोक्यात येऊन नष्ट होऊ पाहत आहे.
आदिवासी समाजात श्रम, समुह,सहकार या तत्तवाना महत्व देऊन कोणतेही कार्य पारपाडले जात असे. आज ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी व आदिवासी देवीदेवता,इतिहास, कला,सण-उत्सव, बोलीभाषा, रितीरिवाज, पर्यावरण सुरक्षा विषयी भावीपिढीच्या आधार व संस्कृतिची ओळख होणेसाठी तमाम आदिवासी समाजातील पोलिस पाटील, सरपंच, गांव पंच (गांवडाया),पुजारा,बोडवा, मोढवी, सामाजिक कार्यकर्ते यांची आदिवासी महापंचायत(बैठक) आयोजित करण्यात आले असुन समाजबांधवांनी उपस्थित राहावे.