
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
श्री.रमेश राठोड
सावळी सदोबा :- आर्णि तालुक्यातील मौजा माळेगांव येथील रहिवासी स्व.संतोष मोतीराम चव्हाण यांचे दिनांक १८/४/२००६ रोजी पळशी ता.घाटंजी येथील गीताताई राठोड यांच्याशी विवाह झाला,विवाहानंतर नवदाम्पत्याला एक वर्षात भारत व दुसऱ्या वर्षात बादल अशी दोन मुले झालीत,परस्थिती खूप हालाखीची असल्याने,संतोषच्याकुटुंबात कुणाकडे शेती नसलेल्या,संतोष अशिक्षित असल्याने मजुरी शिवाय कुटुंबाला पर्याय नव्हता,संतोष रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित होता.
पण दिवस अचानक संतोष यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने,गीताताई यांच्या कुटुंबावर एक प्रकारे संकटच कोसळले,आपल्या कुटुंबाचा आधार व कमवता नवरा गेल्याने पत्नी गीतावर कुटुंबाचा भार पडला,आपल्या दोन लहान मुलांना घेऊन मोलमजुरी करून,आपल्या दोन्ही लहान मुलांचा सांभाळ करत असताना,अचानक गीता आजारी पडली,खूपदा दवाखान्यात पण दाखवण्यात आलेत,मी आजारी पडली माझ्या लहान मुलाबाळाचं कसे होईल या चिंतेत ती नेहमी राहते होती.
पण दीर्घ आजाराने गीताचा पण अचानक मृत्यू झाला आणि भारत व बादल दोन्ही मुले लहान वयातच अनाथ झाली,भारत संतोष चव्हाण व बादल संतोष चव्हाण या दोन्ही मुलांचे लहान वयातच हरवले आई वडिलांचे छत्र हरवलेत,दोन वर्षाअगोदर वडील संतोष चव्हाण यांचे अल्पशा आजाराने मृत्यू झालेत,आणि मागच्यावर्षी दिनांक १०/५/२०२१ आई गीताबाई संतोष चव्हाण यांचे पण दीर्घ आजाराने निधन झालेत मोलमजुरी करून आपल्या मुलांचा व कुटुंबांचा सांभाळ करणाऱ्या आईचे निधन झाल्याने,दोन्ही मुलं लहान वयातच पोरके झाले आहेत,या दोन्ही मुलांची लहान वयातच वडिलांचे छत्र हरवलेले परिसरामध्ये हळहळ होत आहे.