
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि
कवी सरकार इंगळी
चंदूर .ता .हातकणंगले. जि कोल्हापूर :- येथे प्रथमच कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आणि विदयार्थी सार्वजनिक ग्रंथालय चंदूर आयोजित १०वे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, रविवार दि ६मार्च २०२२रोजी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९वाजता ग्रंथदीडीनेसंमेलनाची सुरवात होणार असून सदर साहित्य संमेलनास अध्यक्ष प्रसिद्द साहित्यक,सितायणकार प्रा,किसनराव कुऱ्हाडे, हे भूषवणार असून संमेलनास उद्घाटन समाजसेविका, कवियत्री श्रीमती संगीताताई भाऊसाहेब जामगे गंगाखेड पुणे तर कविसंमेलन अध्यक्षा सौ,श्लेषा शिवदास कारंडे सांगोला, आणि प्रमुख पाहुणे विनोदी कथाकथनकार लेखक प्रा,शांतीनाथ मांगले बलवडी ता खानापूर ,जि,सांगली. हे उपस्थीत राहाणार आहेत.संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मा,माजी ,सभापती महेश पाटील चंदूर असून,ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ,अनिता माने यांचे हस्ते फोटो पुजन करणेत येणार आहे.
संमेलनात मी आणी माझी ग्रंथसंपदा या विषयावर लॉकडाऊन कांदबरीचे लेखक डा,श्रीकांत पाटील, मनोहर भोसले,प्रा,सुरेश कुऱ्हाडे,गडहिंग्लज सिराज शिकलगार हे सहभागी होणार आहेत. तसेच,विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या साहित्यकांना, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, संमेलनास अ््ड कवी
,विजय कांबळे,मुंबई कवी मधूकर हूजरे उस्मानाबाद ,गीतकार कवी,अमोल साबळे सोलापूर कवियत्री सौ सिंधू काळे सोलापूर कवी,अशोक पवार कडेगांव ,गजलकार सिराज शिकलगार आंदळी कवी लक्ष्मन मलकापूरे चंदूर,कवी बळीराम कदम सात्तापा सुतार,रशिद तहशिलदार,महादेव कुशाप्पा,ऋजुता माने मिरज ,गीतकार प्रा,नोबत कोलप सांगली, सौ,संगीता पाटील, पत्रकार गजानन खोत,लेखक मनोहर भोसले,दस्तगीर नदाफ सौ,आरती लाटणे, सौ, वृषाली होगाडे,,सौ,सारीका पाटील हालसवडे पल्वी ढवळे इंचलकरंजी तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्हातील साहित्यक उपस्थीत राहाणार असून चंदूर गांवचे विद्यार्थी युवक सार्वरजनिक ग्रंथालय आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कमिटी संमेलन तसेच पत्रकार सुरेश कुंभार,बळीराम कदम ,अध्यक्ष विजय रावसो पाटील ,प्रमोद चौगुले, सचिव प्रविण पाटील व सर्व संचालक मंडळ संमेलन यशस्वी करणेसाठी प्रर्यंत करीत आहेत असे कवी सरकार इंगळी यांनी हे प्रसिद्घीपत्र प्रसिद्दी दिले आहे.