
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कौठा सर्कल
एस.डी.बोटेवाड
कंधार :- कंधार तालूक्यातील अनेक मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून सतत मागण्या वीस-पंचवीस वर्षा आधीच निवेदनाव्दारे शासानाच्या पाठीमागे ससेमिरा लावुन मागणी लावून धरत पण सत्ताधारी जाणुनबुजुन दुर्लक्ष करत,पण कांही वर्षजाताच ती केलेली मागणी समाजहिताची वाटाय लागायची सध्या हाय-वेची मागणी कंधारवरुन जाण्याची होती.वर्तमानात काळातील सत्ताधार्यांनी आपल्या मनाने इतरत्र वळवून कंधार शहरातच्या बाजुने नेण्याचे पातक केले अन् श्रेय लाटून मोकळे झाले.
आत्ता रेल्वे मार्गाचे ही तसेच होणार मुळ मागणी केली होती डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांनी पण सत्तेच्या धुंदीत श्रेयवाद घेण्याच्या स्वार्धांधच्या नादी लागून आम्हीच रेल्वे मागणी केली म्हणून दिंडोरा पिटविण्यात धुंद दिसतात. माजी खासदार व आमदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,आदरणीय डाॅ भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी.तत्कालीन भारतीय रेल्वेमंत्री नितीश कुमारजी यांचे कडे कंधारहून जाणार्या रेल्वे मार्गाची मागणी केली होती.जवळपास 400/500 शे. प्रती मान्यवरांना पाठवल्या आहेत, ते ही रंगीत नकाशासहित तो नकाशा माझ्या समर्थ हस्ते साकार केला.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार