
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
मोघा :- लोहारा तालुक्यातील मोघा गावात सन 2021 -2022 मध्ये मंजूर झालेला कामामध्ये बोगस मजूर दाखवून पैसे उचलले आहेत. या कामाच्या चौकशीसाठी तसेच ग्राम रोजगार सेवक याच्या नेमणुकीची चौकशी व्हावी म्हणून ग्रामपंचायत सदस्य असलेले शिवदास पाटील 23 /12 /2022 पासून ग्रामपंचायत कार्यालय मोघा येथे उपोषणास बसले आहेत निवेदनामध्ये म्हटले आहे की
मजुराच्या मस्टरवर मजुराच्या नावापुढे संपूर्ण स्वाक्षरी व त्याच्या अंगठ्याचे ठसे हे मजुरांची नसून त्यावर ते संपूर्णपणे बोगस खोटी केलेले आहेत, ज्या रोजगार सेवकाची निवड करण्यात आली आहे ते रोजगार सेवक सुद्धा अनधिकृत निवड करून घेतलेले आहेत.
सदरील कामाची रक्कम शासनास फसवून उचलण्यात आली आहे ,मजुराच्या मस्टरवर ग्रामसेवक सचिवाची स्वाक्षरी नाही .
झालेले काम हे संपूर्ण बोगस असून या कामाची चौकशी करण्यात यावी व जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे व जेवढी रक्कम शासनास पासून उचलण्यात आली आहे ती रक्कम त्यांच्याकडून वसुल करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय लोहारा येथे देण्यात आले आहे.
त्याच अनुषंगाने पंचायत समितीस शिवराज पाटील यांनी वेळ देऊनही सदरील निवेदनावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे शिवराज पाटील हे ग्रामपंचायत कार्यालय मोघा येथे उपोषणास बसले आहेत पहिल्या दिवशी कुठलीच दखल पंचायत समिती लोहारा यांनी घेतली नसून सदर उपोषण ठिकाणी पोलीस संरक्षण देखील दिलेले नाही त्यामुळे उपोषण कर्त्यास तात्काळ वैद्यकीय मदत ही मिळणार नाही.