
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
राम पाटील क्षीरसागर
शेवडी बा :- लोहा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या शेवडी बाजीराव सेवा सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली असून या सेवा सोसायटीवर शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नेते प्रा मनोहर धोंडे सर यांच्या गटाने वर्चस्व मिळवित १३ पैकी १३ जागेवर त्यांच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सध्या लोहा तालुक्यात सेवा सहकारी सोसायट्याच्या निवडणूका चालू असुन यात शेवडी (बा.) सेवा सहकारी सोसायटीची ही २०२२ ते २०२७ सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची शेवटचा आज दिनांक २४ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस होता .
शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नेते प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. सरपंच कैलास धोंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या १३ जणांनी उमेदवारी दाखल केली होती व विरोधकांना उमेदवारच मिळाले नसल्यामुळे प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. सरपंच यांच्या नेतृत्वाखाली पुढील १३ उमेदवारांची निवड बिनविरोध झाली असून केवळ औपचारिकता बाकी आहे.
शेवडी (बा) सेवा सहकारी सोसायटीसाठी बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे ( १) गणपती भाऊराव चपटे (२) केशव जळबाजी टेळके ( ३) कमलाकर विनायक पांडे( ४) शेख इसाक शेख नवाज (५) गुणवंत माणिका येजगे (६) सौ. भागिरथाबाई राजाराम धोंडे,(७)श्रीमती ललीताबाई गणपती शिकारे,(८) गंगाधर तुकाराम चिकाळे,(९) बालाजी सटवाजी बहणे,(१०) धोंडीबा काटवटे,(११) महादू शिवराम नरंगले,(१२) बालाजी दासू राठोड (१३) निवृती मरीबा आगबोटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शेवडी (बा) येथील या नवनिर्वाचित सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यांचा सत्कार लोहा येथे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या लोहा येथील जनसंपर्क कार्यालयात व शेवडी (बा) गावात गावकर्यांच्या हस्ते व ग्राम पंचायत कार्यालय शेवडी बा यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी मा. सरपंच कैलास धोंडे, सरपंच बसवेश्वर धोंडे बंडु चपटे ग्रा.पं.सदस्य, कैलास राईकवाडे तंटामुक्ती अध्यक्ष, बाबुराव फुलझळके, पुंडलिक इदुलवड, अरूण राईकवाडे, नागेश मांचुद्रे, अमोल पांडे, गजानन चावरे, बंन्डु घुंगराळे, शिवहार फुलझळके, गणेश मामा चव्हाण, पंडीत राठोड यांच्यासह मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन श्री. चिल्ले साहेब यांनी काम पाहिले