
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
विश्वास खांडेकर
नांदेड :- वासवी क्लब नवीन नांदेड नुतन कार्यकारणी पदग्रहण सोहळा गुरुकृपा मंगल कार्यालयात सिडको येथे संपन्न झाला. वासवी क्लबचे अध्यक्ष म्हणून शिवानंद गणेशराव निलावार सचिव म्हणून बालाजी कौटिकवार तर कोषाध्यक्ष म्हणून स्वप्निल येरावार यांची निवड करण्यात आली व त्यांनी पदग्रहण केले तर वनीता वासवी क्लबच्या अध्यक्षपदी सौ छाया निलावार सचिवपदी सौ सुनीता कौटीकवार तर कोषाध्यक्षपदी सौ कोमल येरावार यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय काचावर यांनी केले या पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षपदी दिलीप कंदकुर्ते व प्रमुख अतिथी किरण चिद्रावार ,सतीश वट्टमवार, संजय पांपटवार ,डॉक्टर नरेश रायवार ,प्रशांत चालीकवार, लक्ष्मण रेवनवार, बालाजी रहाटकर, उदयकुमार पातावार, गजानन बंडेवार, तुकाराम पातेवार, मनोज कोटलवार, गणेश मामीडवार, राजकुमार कोटलवार, गोविंद कौटीकवार सुधीर बिडवई यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली व त्यानंतर भारतरत्न स्वर गानकोकिळा स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांना संगीतमय भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. देशभक्तीपर गीतांनी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.