
दैनिक चालु वार्ता
नवीन नांदेड प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
नांदेड :- महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. अशोकराव चव्हाण यांच्या दृष्टीकोनातून व कुशल नेतृत्वाने नांदेड जिल्ह्याच्या विकास हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे कैलासवासी डॉ. शंकरराव चव्हाणांचा विकासात्मक दृष्टीकोनाचा वारसा मा.ना.अशोकराव चव्हाण हे नेटाने पुढे नेत आहेत. समृद्धी महामार्ग व आरोग्याच्या अनेक सुख सुविधा सह अनेक विकासात्मक कामे होण्यासाठी मा. ना. अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून आज नांदेड जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला आहे. या विकास निधीचा वापर उत्तम व दर्जेदार कामातून झाला पाहिजे.
केवळ नारळ फोडून चालणार नाही. जनतेमध्ये जात असताना आपल्या कामाच्या बळावर जनतेने आपल्या कार्याचे प्रशंसा केली पाहिजे, तरच येत्या काळात मा.ना. अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट होतील हे सिद्ध होईल. येत्या काळात सिडको हडको भागाचा विकास मा.ना. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात वेगाने वाढेल येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला एक हाती सत्ता द्या व मा.ना. अशोकराव चव्हाणांचे हात बळकट करा असे प्रतिपादन आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सिडको येथे केले.
आज दिनांक २४.०२.२०२२ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, राम नगर सिडको येथिल नगरसेविका सौ मंगला गजानन देशमुख यांच्या प्रभाग क्रमांक (२०) मूलभूत सोई सुविधा योजना अंतर्गत एक कोटी रुपयाच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा व जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमा प्रसंगी ते उद्घाटक रुपी या नात्याने बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महापौर सौ जयश्री ताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार ,सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पक्ष प्रभारी ॲड. संतोष पांडागळे, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, संजय इंगेवाड, सिद्धार्थ गायकवाड, ॲड. सतीश पुंड, प्रा. डॉ. ललिता शिंदे, डॉ. करुणा जमदाडे, सतिश बस्वदे, यांची उपस्थिती होती.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय देशमुख यांनी केले. तर मनोगत व्यक्त करतांना महापौर जयश्री पावडे म्हणाल्या सिडको-हडको हा भाग विकासापासून उपेक्षित आहे आणि साहेबांच्या माध्यमातून येत्या काळात संपूर्ण विकास होणार आहे. आणि माननीय नामदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी सिडको-हडको कडे वैयक्तिक लक्ष देण्याचा प्रयत्न करेल. येत्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला एक हाती सत्ता द्या असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
तसेच यावेळी पक्षप्रवक्ते तथा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी पक्ष प्रभारी ॲड. संतोष पांडागळे म्हणाले की सिडको हडको व नांदेड दक्षिण ची जनता फार भाग्यवान आहे. त्यांना मोहन अण्णा हंबर्डे यांच्यासारखे आमदार लाभले. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या रूपाने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा येत्या काळात चेहरा-मोहरा बदलल्या जाईल अशी ग्वाही त्यांनी देऊन आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या कार्याचे कौतुक केले.
उपमहापौर अब्दुल गफार यांनी आपल्या मनोगतात बोलत असताना माझ्यासारख्या एका नवतरुण युवकाला उपमहापौर म्हणून कार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांचे आभार मानून येत्या काळात सर्व नव तरुणांनी काँग्रेस पक्षाला भक्कम पने साथ द्यावी असा मनोदय व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पत्रकार डी. गा. पाटील यांनी केले.
यावेळी दलीतमिञ नारायण कोलंबीकर, प्रा. अशोक मोरे, भि.ना. गायकवाड, डॉ. नरेश रायेवार, डॉ.अशोक कलंत्री,शेख लतीफ, आहात खान पठाण, विश्वनाथ शिंदे, नुरोद्दीन मामू,
के. एल.ढाकणीकर,निवृत्ती कांबळे, माधव आंबटवार, माधव देवसरकर,आनंदा गायकवाड ,गजानन कहाळेकर, राजू लांडगे, वैजनाथ माने, सुनील शिंदे,शंकरराव धिरडीकर, माणिकराव श्रोते, प्रल्हाद गव्हाणे,आर. जे. वाघमारे, अमोल जाधव, शेख रसूल, किशोर देशमुख, फिरोज शेख, शेख हुसेन,पप्पू गायकवाड, प्रसेनजित वाघमारे, प्रतीक जमदाडे, प्रशांत डहाळे, विनोद वंजारे, विक्की खांडेकर,फिरोज शेख, श्रीमती सुभद्रा कदम, सौ.विमल ताई चित्ते सौ. कविता चव्हान,सौ सुमन पवार, सौ. देबाडवार, अनीता गज्जेवार, यांच्यासह राम मंदिर व स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.