
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा दि.25 :- वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने युवा प्रदेश अध्यक्ष नीलेशजी विश्वकर्मा व प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे हे बुलडाणा जिल्ह्यातील युवा आघाडी कार्यकारिणी गठीत करण्यासाठी मुलाखती घेणार आहे.ह्यामध्ये बुलडाणा जिल्हा ( उत्तर) व शेगांव, खामगांव, जळगांव जामोद, मलकापूर, नांदुरा,संग्रामपूर या तालुक्याच्या तालुका व शहर कार्यकारिणी गठीत करणार आहेत.
तरी युवक – युवतींनी मोठ्या संख्येने मुलाखतीसाठी उपस्थितीत राहून अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अॅड. अनिल इखारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.शासकीय विश्रामगृह शेगांव येथे दि.२६ फेब्रुवारी ला दुपारी १२ वा ह्या मुलाखती होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बुलडाणा जिल्हा प्रभारी प्रा. डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांची विशेष उपस्थिती ह्यावेळी राहणार आहे.