
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी जुन्या पेन्शन पासून प्रभावित असून ही पेन्शन योजना पूर्वरत सुरू करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घेताना दिसून येत परंतु अद्यापही महाराष्ट्रातील कर्मचार्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. परंतु दिल्ली सरकारच्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा पूर्वीच करण्यात आली आहे. तद्नंतर राजस्थान प्रदेश सरकारने काल सभाग्रहात सन2004 नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आणि तमाम राजस्थान मधील शिक्षक बंधू भगिनी तद्वतच सर्व विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
याचाच एक भाग म्हणून राजस्थान सरकारणे उचललेले पाऊल महाराष्ट्रातील पेन्शन ग्रस्त कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासारखे आहे म्हणायला हरकत नाही, महाराष्ट्र सरकार कडून सुद्धा आगामी काळामध्ये नक्कीच सर्व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेईल ही अपेक्षा कुठेतरी, पठारावस्था आलेल्या संघटनेच्या उद्दिष्टाला, राजस्थान सरकारच्या निर्णयाने उजळा मिळाला असून नक्कीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,सर्व पक्षाचे मंत्री आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे.
राजस्थानमधील सर्व आमच्या बंधू भगिनींच्या आनंदामध्ये सहभागी म्हणून आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा लोहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून घालून, फटाक्यांची आतिषबाजी करून व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आर जी वाघमारे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणपती बोथीकर, ता.अध्यक्ष मंगल सोनकांबळे, संघटनेचे सदस्य पदाधिकारी संतोष जोशी, विशाल महाबळे, ओंकार बोधनकर ,बालाजी बालाघाटे, वाडकर सर,पवार सर लोंढ सर ,बडगिरे सर वाघमारे सर , पत्रकार विनोद महाबळे, पत्रकार विलास सावळे, पञकार गोविंद पवार आझाद समाज पार्टीचे युवा नेते बुद्धभूषण खिल्लारे,सिद्धार्थ नगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते केशव वाघमारे ,युवा नेते अभीभाऊ लिंबोटीकर आदी उपस्थित होते.