
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड :- रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युद्ध घोषित केले आहे .या परिस्थितीत युक्रेनमध्ये नांदेड जिल्ह्यातील नागरिक अडकलेले असल्यास तात्काळ सदर नागरिकांच्या नातेवाईकांनी जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क करून कळवावे. जेणेकरून अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल. याबाबत नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, युक्रेनमध्ये अडकलेले त्यांचे नातेवाईकांबाबत तात्काळ जवळच्या तहसिल कार्यालयास कळवावे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावे असे आवाहन प्रदीप कुलकर्णी( निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड) यांनी नांदेड जिल्ह्यातील जनतेला केले आहे .
आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नंबर १०७७ किंवा (०२४६२) २३५०७७ या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच याबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर १८००११८७९७ (टोल फ्री), +९१-११-२३०१२११३, +९१-११-२३०१४१०४, +९१-११-२३०१७९०५ आहे व फॅक्स नंबर +९१-११-२३०८८१२४ हा आहे व तेथील ई-मेल आय डी situationroom@mea.gov.in हा आहे. नांदेड जिल्ह्यातील कोणी नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी वरील नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मा.जिल्हाधिकारी, नांदेड यांनी याद्वारे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.