दैनिक चालु वार्ता। अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी। बालाजी देेशमुख
.बीड आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत बीड जिल्ह्याची पेन इंडिया लीगल अवेअरनेस आणि चॅम्पियन बीड या राज्यस्तरीय उपक्रमासाठी बीड जिल्ह्याची निवड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्यात या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संभाव्य उपक्रमाच्या माध्यमातून सकारात्मक कामाच्या अंबलबजावणीसाठी जिल्ह्याला मिळालली संधी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. प्रमुख जिल्हा सत्र व दिवाणी न्यायाधीश न्या. श्री हेमंत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आज पूर्व तयारी बैठक संपन्न झालीजिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्री आर राजा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार जिल्हा न्यायालयाच्या विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. श्री. सिद्धार्थ गोडबोले अपर जिल्हाधिकारी बौद्ध श्री तुषार ठोंबर अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई श्रीमती मंजुषा मिस्कर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत हे उपस्थित होतेर्बठकीमध्ये जिल्ह्यातील विविध प्रमुख शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी संभाव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उभारण्यात येणारे स्टॉल आणि शासकीय विभागाच्या वतीने योजनांच्या लाभाचे माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात येत असलेल्या तयारी बद्दल माहिती दिलीयाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी या राज्यस्तरीय उपक्रम ना मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या वतीने जवळपास दहा स्टॉल्स उभारण्यात येतील आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांना देखील यावेळी प्रमाणपत्र व पत्र देण्यात येतील असे सांगितले