
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे
औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना.नवाब मलीक यांना ईडीकडून झालेल्या अटकेच्या निषेधार्थ तिव्र निदर्शने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष पाटील माने,माजी नगराध्यक्ष संजय जाधव,अमोल पाटील जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. दरम्यान नरेंद्र मोदी व भाजप सरकार ईडीच्या आडून कारवाया करत असल्याचा आरोप करून भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.