
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा तालुक्यात औषधी विक्री क्षेत्रात (मेडीकल) उल्लेखनीय कार्य करणारे संजय मोटे पाटील,व दिनेश मोटे पाटील यांची जिल्हा व तालुका स्तरावरील महत्त्वाच्या पदांवर म्हणजे केमिस्ट्री अॅड ड्रगीसट अशोसिएनच्या मुख्य जिल्हा सचिव पदी व लोहा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यात नांदेड जिल्हा केमिस्ट अँड डॢगीस्ट असोसिएशन जिल्हा मुख्य सचिव पदी संजय मोटे पाटील यांची व लोहा तालुका केमिस्ट अँड डॢगीस्ट असोसिएशनच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी दिनेश मोटे पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
मेडीकल क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असलेल्या केमिस्ट्री अॅड ड्रगीसट अशोसिएनच्या नांदेड जिल्हा मुख्य सचिव पदी संजय मोटे पाटील व लोहा तालुकाध्यक्ष पदी दिनेश मोटे या दोन्ही मोटे बंधुची निवड झाल्याबद्दल त्यांचा लोहा येथे लोहा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने शाल, श्रीफळ,व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक संदीप दमंकोडावार, नगरसेवक नबी शेख, नगरसेवक अमोल व्यव्हारे ,युवा नेते सचिन सुर्यवंशी, आदी उपस्थित होते.