
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
इंगळी ता हातकणंगले येथील सकल मराठा समाज इंगळी यांच्या अथक संघर्षातून व लोकवर्गणीतून उभा करण्यात येत असलेल्या इंगळी येथील मराठा भवनाचा भूमिपूजन व पाया खुदाई समारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विध्यमान आमदार मा राजूबाबा आवळे ,माजी,खा,निवेदीता माने वहीणी ,मा सागर सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटना, भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार राजूबाबा आवळे यांचे फंडातून २५ लाख रूपये,खासदार धैर्यशिल माने यांचे फंडातून १० लाख रूपये मंजूर झाले असून आमदार सदाभाऊ खोत,यांचे फंडातून १०लाख रूपये,अशोक माने बापू,यांनी ५ लाख रू,सौ,स्मिताताई शेंडूरे यांनी आपले फंडातून मदत देणेचे आश्वसन दिले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे , मा, विरकुमार शेंडूरे हुपरी, गावच्या सरपंच शालन पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,युवा नेते कृष्णात मसुरकर, मा, रावसाहेब पाटील, बाबुराव पाटील, जंबूकुमार देसाई, , गोगा बाणदार, शशिकांत मोरे,ग्रामपंचायतचे सदस्य, इंगळी सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते मराठा बांधव,यांच्यासह इंगळी गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व तरुण मंडळी, महिला बचत गट, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.