
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
चाकूर :- तालुक्यातील मौजे बोथी ( तांडा ) येथे श्री सदगुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उद्घाटकीय सामना हाळी विरुद्ध वाढवणा या दोन संघामध्ये झाला.या दोन्ही संघातील खेळाडूचा परिचय राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांनी करुन घेऊन सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधरप्पा अक्कानवरु,श्री विश्वनाथ एडके,राकाँपाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकारामजी जाधव,अंकुश बोमदरे,शंकर चव्हाण,विश्वनाथ राठोड,नवनाथ आवाळे,संयोजक नागेश राठोड,धर्मपाल पवार,सुनिल जाधव,बाळू जाधव,नितीन जाधव,मारुती जाधव उपस्थित होते.