
दैनिक चालु वार्ता
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी :- कसल्याही प्रकारच्या जमिनीत आणि कमी पाण्यात येणारे बांबूंचे पीक एकरी ४० ते ५० टन उत्पादन देतेच परंतू लाख ते दीड लाखापर्यत उत्पादन निघू शकते . बांबू शेतीने आटपाडी तालुक्यात मोठी आर्थिक क्रांती होवू शकते. असे मत सीमा बायोटेक कोल्हापूरचे ॲग्रोनॉमिस्ट विकास पाटील, जॉली बोर्ड कवठेमहंकाळचे फॅक्टरी मॅनेजर गणेश शिंदे आणि माणगंगा उदयोग समुहाचे प्रणेते आनंदरावबापू पाटील यांनी व्यक्त केले .
आटपाडी तालुक्यामध्ये बदलत्या हवामनानुसार बांबू हे शाश्वत व खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक म्हणून पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर बांबु लागवडी संदर्भात चर्चा करणे आणि बांबु उत्पादक संघ स्थापन करण्याच्या उद्देशाने कृषी तंत्र विद्यालय आटपाडी येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती . त्यावेळी मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले .
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागाचे राष्ट्रवादीचे नेते विलासरावनाना शिंदे, आवळाईचे सरपंच बाळासाहेब जाधव, प्रगतीशील बागायतदार शहाजीरावदादा पाटील, गुलाबराव पाटील, विजयसिंह इनामदार, नेताजी पाटील, दिलीपराव देवकते, एकनाथ गायकवाड, सचिन खंडागळे, कृष्णा साळुंखे, एस. यु. भिंगारदिवे, संपतराव देशमुख, ए.एन. खिलारी एस. जे. वाघमारे, पांडुरंग दडस, अजय म्हारनुर, शिवकुमार साळूंखे, लक्ष्मण सरगर, शशिकांत ननवरे, शामराव म्हारगुडे, विकास विभूते, सचिन मिसाळ, सुश्मिता हणमंते,कृष्णा होळे, नंदकुमार विभूते, संजय धायगुडे, शंकर गिड्डे, मनोहर विभूते इत्पादी मान्यवर उपस्थित होते.
बांबु ही जंगली वनस्पती वजनाने हलकी, लवचिक, दणकट आणि बहु उपयोगी असल्याने याच्या तोडणी वाहतुकीसाठी कसलीही परवानगी घ्यावी लागत नाही . दगडी कोळशाएवढेच उष्णांक मुल्य असलेल्या बांबुचा औदयोगिक क्षेत्रात कागद, प्लायवूड, फर्निचर आणि इंधनासह इतरत्र उपयोग होतो . काहीच न येणाऱ्या जमिनीत ही उत्तम येणाऱ्या बाबुंच्या १३४ पैकी १५ ते १६ जाती औद्योगीक वापरासाठी आणि उत्पन्नासाठी चांगल्या आहेत . एकरी ३० ते ५० टन उत्पादन येणाऱ्या बांबू उत्पादनातून लाख ते दीड लाखाचे एकरी उत्पादन मिळू शकते .
दुष्काळ आणि महापुरातही टिकून राहणाऱ्या बांबु पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास बांबू एकरी शंभर टनापर्यतही येवू शकेल. बांबु चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्यास मोठे मोठे कारखानदार जाग्यावर येवून बांबू खरेदी करतील . असा विश्वास अँग्रोनॉमिस्ट विकास पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. बांबू मार्केट बदल खूप महत्त्वाची माहीती देताना ज्वॉलीबोर्ड कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर गणेश शिंदे यांनी,बांबू कुठे कुठे, पेपर अँड पल्प इंडस्ट्रीजसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो याची माहीती देत, सध्या मार्केट मध्ये दगडी कोळशाचे रेट खूप वाढले आहेत.
त्यामुळे मोठ मोठ्या इंडस्ट्रीज बायोफ्युल कडे वळल्या आहेत आणि बांबू हे एक खूप चांगल्या प्रतीचे बायोफ्यूल आहे . तुम्ही जेवढा बांबू लावाल तेवढा कंपनी चांगल्या प्रतीचे रेट देउन विकत घेईल .सध्या ज्वालीबोर्ड कंपनी प्रतिदिनी ४० ते ५० टन बांबू विकत घेते . चांगल्या दर्जाच्या बांबुला ४५०० रुपये पर्यत दर मिळू शकतो असे स्पष्ट केले. १९८७ साली सुरु केलेल्या डाळींब लागवडीतून संपूर्ण माणदेशात डाळींबाचे क्षेत्र फोफावले गेले .
एकरी २० लाखापर्यत उत्पादन दिलेल्या डाळींबाने आटपाडी सह माणदेशात खरी आर्थिक क्रांती केल्यानेच उसतोड कामगार ,मेंढपाळी गिरणी कामगार, गलाई कामगार, हमाली साठी देशोधडीला लागलेल्या स्थलांतरीत हजारोंना जाग्यावर स्थिर केले . अल्प पाण्यात ही क्रांती घडली . आता तर टेंभूचे पाणी सर्वत्र आले आहे . आणि कमी पाणी,कमी श्रम आणि कमी खर्चात मोठे उत्पादन देणाऱ्या बांबू पिकातून आटपाडी तालुक्यात दुसऱ्या आर्थिक क्रांतीसाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन आनंदरावबापु पाटील यांनी स्वागत प्रास्ताविकात केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोहर विभूते यांनी केले .