
दैनिक चालु वार्ता
दौंड प्रतिनिधी
अरुण भोई
दौंड :- दौंड तालुका शेतकऱ्यांची कृषीपंप वीज जोडणी ८ दिवसाच्या आत पूर्ववत करा अन्यथा जिंवत पणे चिता (सरण ) आंदोलन करण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा दौंड तालुक्यात महावितरण कंपनीने कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज जोडणी तोडायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या महामारी पासून शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे .
शेतकरी अडचणीत आहे, गुरा-ढोरांचा व त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न आहे, शिवाय शेतातील पिकं, फळबागांना पाणी देणे आवश्यक आहे. शेतकरी हवालदिल झाला असून तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची पाणी असूनही पीके जळून नुकसान होणार आहे . शेतकऱ्यांची वीज तोडून शेतकऱ्यांच्या चुलीत महावितरण कंपनीने पाणी ओतू नये. शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडणी ताबडतोब ८ दिवासाच्या आत पूर्ववत करावी. अन्यथा महावितरण कंपनीच्या केडगांव येथील कार्यालयासमोर जिवंत चिता आंदोलन करण्यात येईल.
असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे – देशमुख यांनी महावितरण वीज कंपनीला दिला आहे असे लेखी निवेदन महावितरण वीज वितरण कंपनीला दिले आहे .
यावेळी दौंड तालुक्याचे उपाध्यक्ष रफिक सय्यद चिटणीस डॉक्टर राहुल शेलार कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रमोद शितोळे महिला आघाडीच्या अध्यक्षा शबाना मुलाणी प्रशांत ठोंबरे ,रुपेश रोकडे , भरत मोरे उपस्थित होते .