
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- क्रांतिकारी सुरक्षारक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षकांच्या मागण्यासाठी व न्याय हक्कासाठी दि,१९ फेब्रुवारी २०२२ पासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले संघर्ष समितीचे समन्वयक पत्रकार सतीष एस. राठोड हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधून सुरक्षारक्षकांचा सहभाग आहे, तसेच कामगार संघटना १५ ते १६ संघटनेचा पाठिंबा आहे, त्या अनुषंगाने नेताजी काँग्रेस सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रंगाशेठ, आमदार रवी राणा, राष्ट्रीय बंजारा परिषद , भारतीय मराठा संघ, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना अंतर्गत भारतीय महा क्रांती सेना आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश दादा संकुडे, सुरक्षारक्षक ज्ञानेश्वर आवळे, चंद्रकांत गायकवाड यांचा हि या उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे. अशी माहिती, संघर्ष समितीचे सदस्य कांता राठोड यांनी दिली आहे.
दरम्यान उपोषणाच्या सहाव्या दिवशी दि,२३ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रधानसचिव सिन्हा मॅडम यांच्याशी समितीची भेट निश्चित झाली होती. त्यासाठी शिष्टमंडळ तयार करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने सचिन राऊत भारतीय सुरक्षा रक्षक सेना ,अमिय देशे युवा स्वाभिमानी सुरक्षारक्षक कामगार न्याय संघटना, गंगाधर वाघमारे व अभिलाष डावरे माय बळीराजा सुरक्षारक्षक वाहन चालक जनरल वर्कर्स युनियन, कांता राठोड समिती समन्वयक यांची नावे देण्यात आली होती. तरी दुपारी २:३०वा. मीटिंग कॅन्सल करण्यात आलेली आहे.असे सांगण्यात आले. व शुक्रवारी दि, २५ फेब्रुवारी रोजी मिटिंग घेण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
सुरक्षा रक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला कामगार मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची भेट हवी आहे. ते देण्यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे अन्यथा कामगार मंत्री महोदय यांच्या घरासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.अशी माहिती समन्वय संघर्ष समितीने प्रसिध्दीस केलेल्या पत्रकात म्हटले आहे.