
दैनिक चालु वार्ता
म्हासावद सर्कल प्रतिनिधी
सुनील पाटिल
म्हासावद :- शहादा तालुक्यातील व तोरणमाळ च्या पायथ्याशी असलेल्या राणीपुर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नाही , अस्वच्छता ,पंखे बंद सर्वत्र दुर्गंधी येत असूनही अशा वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तर वसतिगृहात शेकडो मुले असुनही त्यांच्यासाठी असलेल्या आठ ते दहा शौचालयापैकी फक्त एकच उपयोगी आहे.
शहादा तालुक्यातील तसेच धडगाव परिसरातील आदिवासी भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध व्हावी , यासाठी राणीपुर येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची निर्मिती करण्यात आली आहे . यात पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे पाचशे ते साहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . त्याच बरोबर वस्तीग्रहाचीही सोय . असून या वसतिगृहात परिसरातील खेड्यातील विद्यार्थी वास्तव्यास आहेत . यामध्ये मुले आणि मुलींचा समावेश आहे या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना जेवण आणि संबंधित सुविधा वेवस्थितरीत्या न पुरविल्या जात आहेत . विद्यार्थ्यांच्या निवासस्थानकात पुर्णतः दुर्गंधमय वातावरण आहे .
( तोट्या नसलेले नळ )
आश्रम शाळा परिसरात विविध उपयोगासाठी एकत्र आठ ते दहा नळ बसवले आहेत . त्यांना तोट्या नसल्याने नळातून सतत पाण्याचा अपव्यय होत आहे . त्यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याची किंवा स्वास्थ देखील खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
( शौचालय निकामी अवस्थेत )
अनेक वर्षांपासून नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे . परंतु ते शौचालयांचे निकामी व निरुपयोगी ठरत असल्याने विद्यार्थ्यांना मिळेल त्या शौचालयाचा वापर करावा लागत असून दुर्गंधी चा सामना करावा लागत आहे .