
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- धसवाडी ता.अहमदपुर जि.लातुर येथील ग्राम पंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली या सभेमध्ये श्री नारायण दिगंबरराव दुर्गे यांनी आॅगस्ट २०१८ मी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती धसवाडी ता.अहमदपुर येथे अध्यक्ष पदावर आपल्या आशीर्वादाने काम करीत आहे.त्यामुळे आज मी अध्यक्ष पद सोडीत आहे असे जाहीर करुन नविन अध्यक्षांची निवड करण्यात यावी अशी विनंती केली असता ग्रामसभेने श्री नाना दुर्गे यांनी अध्यक्ष म्हणून फार चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांनीच यापुढेही अध्यक्ष म्हणून काम करावे असा एकमताने ठराव मांडला व तो ठराव मांडला त्यावर चर्चा होऊन श्री नाना दुर्गे यांची अध्यक्षपदी एक मताने फेर निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी ग्रा.पं.चे सरपंच प्रेमचंद दिगंबरराव दुर्गे,उपसरपंच चंद्रकांत देशमुख,माजी सरपंच अविनाश भैय्या देशमुख, ग्रा.पं.सदस्य गंगाधर कांबळे,पंडीत कासले,गोविंद घोडके,रणजित क्षीरसागर,नामदेव हेमनर,अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती इंद्रजित आयलवाड,माजी चेअरमन प्रकाश क्षीरसागर,वसंत क्षीरसागर ,निखील क्षीरसागर, मारुती हेमनर ,गावचे पोलीस पाटील अंगद जम्मलवाड ,ग्रामसेवक श्री एस.टी.मुस्के यांची उपस्थिती होती.श्री नाना दुर्गे यांनी सर्व ग्रामस्थ यांनी माझी एकमताने फेर निवड केल्याबद्दल आभार मानले व यापुढेही माजी मंत्री व लोकप्रिय व्यक्तीमत्व मा.आर.आर.पाटील (आंबा) यांना अपेक्षेप्रमाणे अध्यक्ष पदाचे काम करण्याचा प्रयत्न करीन अशी हमी देऊन आभार मानले.