
दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
उदगीर :- तालुक्यातील पिंपरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन संचालक याचा सत्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका श्रीमती लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकनेते चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रीतीताई चंद्रशेखर भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील सावळे, विकास देशमाने, शिवाजी पाटील, संजय शिंदे अतनूरकर हे उपस्थित होते.
यावेळी नूतन संचालक तथा माजी चेअरमन शिवशंकर पांडे, खराबे शिवाजी, सुरेश पाटील, सुरेश पटवारी, निर्मला बिरादार, बालाजी घडले, जितेंद्र आडे, भारतबाई काकडे, मच्छिंद्र केंद्रे तसेच गटसचिव जयसिंग कोकाटे, तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील, कार्यकर्ते अनिल आडे, बालाजी नागरगोजे यांचा यावेळी शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.