
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
मलकापूर दि.26 :- ग्रामीण भागातील अतिक्रमण धारकांना घरकुलाचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे आहे त्या जागा त्यांच्या नावावर कायमस्वरूपी करून त्यांचे घरकुल बांधून देण्यात यावे, तसेच गायरान जमिनीवर 1978 ते 1990 पर्यंत ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यांच्या शेत जमिनी शासनाच्या आदेशाने कायम करण्यात याव्यात,अशी आग्रही मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मलकापूर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पी.रि.पा.चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे हे होते. तर प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष गजानन तायडे, माजी उपसरपंच रमेश झनके, गोराळा सरपंच सुशीला इंगळे, तालुकाध्यक्ष प्रकाश सोनवणे ,युवा तालुका अध्यक्ष विनोद इंगळे ,आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राजाभाऊ सावळे यांनी सांगितले की शासनाने घरकुला बाबत व गायरान जमिनी बाबत दलितांचा अंत पाहू नये. जर याचा उद्रेक झाला तर सत्ताधारी पक्षाला खूप महागात पडेल. म्हणून शासनाने वरील दोन्ही मागण्या त्वरित मंजूर कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल.
अक्षय पवार, पंडित गवळी, दीपक खराडे, सुपडा ब्राह्मण, संगीता थाटे, अनिल चव्हाण, स्वप्नील वानखेडे, मिलिंद हेरोडे, रवी मोरे, विश्वनाथ जाधव, मिलिंद खराटे, दिलीप झनके, कृष्णा गोरे, राहुल अवसरमोल, दीपक खराटे,देवा सरदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक शहराध्यक्ष सुमित नरवाडे यांनी तर आभारप्रदर्शन युवानेते मंगेश घोटकर यांनी केले.