
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद
रामेश्वर केरे
औरंगाबाद :- शिवसेना युवासेनातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सावरकर चौक, समर्थनगर येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मी पण सावरकर ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, कॉलेजकक्ष प्रमुख ऋषिकेश जैस्वाल, अॅड.आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे, नगरसेवक सचिन खैरे, जिल्हा चिटणीस मिथुन व्यास, अॅड. मयूर यादव, अॅड. अकर्ष माळवदकर, अॅड. निलेश बोरखडे, संदीप कुंटे, संदीप अहिरे, निलेश सेवेकर, महिला आघाडीच्या विजया अवस्थी, स्मिता जोशी आदींसह नागरिक उपस्थित होते.