
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- आजपर्यंत अनेकांनी पाहिलं आहे की केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. कुणीतरी पहाटे तीनला ट्विट करतं आणि साडेपाचला लोक तिथे जातात. याचा अर्थ सगळ्यांनाच कळतो ना. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट केलं. मला जी माहितीनुसार हे 93 चं प्रकरण आहे. आता आपण २०२२ मध्ये आहोत. ती जागा ज्याची होती त्याचं करार वगैरे सगळं दिलं आहे. नवाब मलिक न्याय व्यवस्थेच्या मार्फत भूमिका मांडत आहेत.
न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून उत्तर दिलं जातं आहे. सरकारं येतात, जातात. मात्र द्वेष भावनेतून वागायचं की नाही वागायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. कालही काही लोकांवर धाडी पडल्या. धाडी पडताना एक पक्षाच्या कार्यकर्ता नेता सोडून, बाकी सगळ्यांवर पडतात यावरून काय बोध घ्यायचा तो जनतेने घेतला पाहिजे. भाजपचे नेते जे म्हणत आहेत की सरकार टीकत नाही त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही कारण मी नेहमी सांगितलं आहे हे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आहे.
यामध्ये महाराष्ट्राचा विकास होणार नाही. ज्याला काही म्हणायचं आहे ते म्हणू द्या. आमचं काम भलं आणि आम्ही भले. ज्याचं बहुमत असतं त्यांचाच कारभार असतो. मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. जे कुणी तारखा देत आहेत त्याला आम्ही काय करायचं? असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.