
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- प्रभाग क्र. २८ आणि २९ मधील घोरपड़े उद्यान , खडकमाळ आळी,शिंदे आळी, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गवरी आळी,मासेआळी ,मोमिनपुरा आणि येथील सर्वच पेठा मधे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असून देखील गेले पाच वर्षे स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आले आहे त्यांनाआणि प्रशासनाला ही याचे गांभीर्य कळावे. म्हणून मनसे तर्फे या भागात मनसे चे कसबा विधानसभा उपविभाग अध्यक्ष संग्राम सुभाष तळेकर यांच्या पुढाकाराने “खड्डे बुजवा”आंदोलन घेण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेल्या वसंत खुटवड, रवि सहाणे, सारंग सराफ,सौ नीताताई समिर पालवे, आनंद कुंदर, प्रवीण क्षीरसागर,सागर कारंडे, तेजस माने, सूरज पंडित,बबलू नाईक, आकाश सूरे,हृषिकेश करंदीकर, शंकर भोसले ,निलेश इनामके, माजिद शेख यांच्या सह आदिंनी फावड़े घेवून सिमेंट खड़ी आणि वाळु टाकून ८ ते ९ ठिकाणचे रस्तेतील खड्डे बुजवले आणि सोबत सत्ताधारी प्रशासनाला येत्या आठ दिवसात या सर्व भागातील खड्डे बुजविन्याचा इशारा मनसे ने दिला आहे.