
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री रमेश राठोड
सावळी सदोबा :- आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा येथील शिव मंदिर परिसरामध्ये सर्वत्र ग्रामवासी यांच्या वतिने दिनांक २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत,शिवरात्री उत्सव निमित्ताने श्रीमद् भागवत व अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे, श्री.श्री.श्री.१००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज श्रीक्षेत्र (माहूर गड) ज्यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.
दैनंदिनी कार्यक्रम सकाळी ६ते ८ काकडा भजन,दुपारी १२ ते ३ भागवत कथा,५ ते ६ हरिपाठ,रोज रात्री ८ते१० पर्यंत हरिकीर्तन घेण्यात येणार आहे, यामध्ये दिनांक २२ फेब्रुवारी रोजी हरिभक्त श्री गणेश महाराज यांचे कीर्तन,दिनांक २३ फेब्रुवारी रोजी ह.भ सेवादास महाराज (आळंदीकर) यांचे कीर्तन,दिनांक २४ फेब्रुवारी कुमारी कांचनताई शेळके यांचे कीर्तन, दिनांक २५ फेब्रुवारी भागवत महाराज (आळंदीकर) यांचे कीर्तन राहील,ह.भ.प. श्री गणेश महाराज गुरमुले शास्त्री आळंदीकर, हार्मोनियम वादक-ह.भ.प.श्री नंदकिशोर डंबारे सर घाटंजी,तबला वादक-ह.भ.प. ओम पिंगळे आळंदीकर, हरिपाठ मंडळ-आशीर्वाद महाराज, रोशन महाराज गावत्रे,अक्षय महाराज मोहरळे,ह.भ.प.नारायन महाराज बोरगाव (पु) दिनांक २७ फेब्रदुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत मिरवणूक दिंडी सोहळा पार पडेल.
दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहेत,तरी या धार्मिक कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान आदर्श गुरुदेव सेवा मंडळ सावळी सदोबा येथील ग्रामस्थांच्यावतीने केले आहेत,