
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा शहरातील जुना लोहा येथे दि. २१-२-२०२२ ते २८-२-२०२२ या कालावधीत अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परम रहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून अखंड शिवनाम सप्ताहाचे यंदा सलग २८ वे वर्ष असुन या अखंड शिवनाम सप्ताहास भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन आज दि. २८ फेब्रुवारी रोजी या अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता श्री गुरु १०८ डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज लासिना मठ पुर्णा यांचे सकाळी ९ ते १२ या वेळेमध्ये महाप्रसादारील किर्तन होईल.
नंतर सर्व गावकरी मंडळी लोहा यांच्या वतीने महाप्रसाद होईल. तेव्हा या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन केशव शेटे , दत्ता वसमतकर ,कैलास कहाळेकर, संजय कहाळेकर, बाळू गुरूजी शेटे, मल्लिकार्जुन शेटे, माधव वसमतकर , ज्ञानोबा वसमतकर , ज्ञानोबा कांजले , विश्वनाथ शेटे, यांच्यासह अखंड शिवनाम सप्ताह समिती व गावकरी मंडळी यांनी केले आहे.