
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- आगामी हो ऊ घातलेल्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकांमध्ये लोहा, कंधार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 जागांवर शेकापचे उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी नांदेड येथील आयोजित शेकापच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला. लोहा, कंधार मतदार संघातील लोहा व कंधार पंचायत समितीवर शेकापचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन ही सौ. आशा ताई शिंदे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर शेकापचे ज्येष्ठ नेते पंडित शेठ पाटील, भाई काकासाहेब शिंदे, लोहा , कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, युवा नेते विक्रांत दादा शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती ज्ञानेश्वर चौडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजी वैजाळे ,उपसभापती शाम अण्णा पवार, जिल्हाध्यक्ष योगेश नंदनवन कर सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष असून शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण नागू पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरां सोबत महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात हिरारीने सहभाग घेऊन जाती व्यवस्थेविरुद्ध प्रखर बंड केले होते.
शेकापच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, महाराष्ट्र कर्नाटक लढ्यांमध्ये भरीव योगदान दिले होते, परंतु पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये शेकापची ताकत वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलादी ताकतीने काम करण्याचे आवाहन आमदार शामसुंदर शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले,व येणाऱ्या काळात लोहा कंधार मतदार संघातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याचा कृती आराखडा तयार केला असून मतदार संघातील महिलां सशक्तिकणासाठी विविध माध्यमातून व योजनेतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले. एक वर्षाच्या काळात शेतकऱ्यांची कामधेनु कलंबर सहकारी साखर कारखाना सुरू करणार असल्याचेही यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
शेतकरी व गोरगरीबांच्या सेवेसाठी आमदार शामसुंदर शिंदे राजकारणात – पंडित शेठ पाटील
आमदार शामसुंदर शिंदे यांना राजकारणात यायची काही गरज नव्हती ते सेवानिवृत्त झाल्यानंतर उद्योगधंद्याच्या माध्यमातून त्यांनी पैसे कमावले असते पण लोहा कंधार मतदार संघातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी दीनदुबळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोहा कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक लढविली असल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते पंडित शेठ पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे नेतृत्व करण्यासाठी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अलिबाग येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्याम सुंदर शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे पंडित शेठ पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जाहीर केले. महाराष्ट्रात तर सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्यासारख समाजासाठी प्रामाणिक, निस्वार्थीपणे धडपडणारी महिला मी पहिल्यांदा आशाताई शिंदे यांच्या माध्यमातून पाहत असल्याचे भाई पंडित शेठ पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी या शेकापच्या कार्यकर्ता मेळाव्यास शेकापचे कार्यकर्ते महिला पदाधिकारीमोठ्या संख्येने उपस्थित होते.